सार्वजनिक क्षेत्रात अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन मोलाचे

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली भावना
सार्वजनिक क्षेत्रात अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन मोलाचे

पारनेर |प्रतिनिधी| Parner

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी सामाजिक जीवनात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, विधि व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे (Minister of State for Industry and Mining, Law and Justice Aditi Tatkare) यांनी केले.

राळेगण सिद्धी (ता. पारनेर) (Ralegan Sidhi) येथे रविवारी राज्यमंत्री तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी हजारे (Anna Hajare) यांची भेट घेतली. यावेळी आमदार निलेश लंके (MLA Nilesh lanke), राष्ट्रवादीचे राजेेंद्र फाळके (NCP Rajendra Phalake) आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी हजारे (Anna Hajare) यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राळेगणसिद्धीचा (Ralegan Sidhi) विकासाची माहितीही त्यांनी घेतली. सार्वजनिक जीवनात अण्णांचे काम आणि योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे नगर जिल्हा दौर्‍यावर येतानाच अण्णांना (Anna Hajare) भेटायचे ठरवले होते. त्यांचा आमच्या कुटुंबीयांशी स्नेह आहे.

त्यामुळे त्यांच्या भेटीने नवीन ऊर्जा मिळाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अण्णांचे सार्वजनिक क्षेत्रातील काम आमच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी राळेगण सिद्धीला आल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी अण्णांनी माजी मंत्री तथा सध्याचे खा. सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधला आणि कौटुंबिक स्नेहाला उजाळा दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com