पुन्हा मोठ्या जनआंदोलनासाठी सज्ज रहा

अण्णा हजारे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पुन्हा मोठ्या जनआंदोलनासाठी सज्ज रहा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सरकार (Government) कोणत्याही पक्षाचे असो ,मात्र जनहिताच्या प्रश्नाकडे सरकार जर डोळेझाक करत असेल तर त्याला जाणीव करून देण्यासाठी पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन (Movement) उभे करावे लागेल, यासाठी सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असलेल्या समविचारी कार्यकर्त्यांनी संघटन उभे करत सज्ज रहावे,असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी केले आहे.

राळेगणसिद्धी (Ralegan Sidhi) येथे राज्यातील निवडक कार्यकर्त्यांशी संवाद (Communication with activists) साधताना ते बोलत होते. भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन (Mass movement against corruption) न्यासाचे विश्वस्त व जिल्हा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.18) राळेगणसिद्धी (RaleganSidhi) येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सुमारे पाच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्न, करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, यावर कार्यकर्त्यांनी व्यापक समाजहिताच्यादृष्टीने योगदान देण्याचे आवाहन हजारे (Anna Hajare) यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

महाराष्ट्र राज्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी सक्षम लोकायुक्त होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यासाठी एक संयुक्त मसुदा समिती कार्यरत आहे. मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी केवळ एक दोन बैठका बाकी आहेत. हा कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलनाच्या तयारीत राहण्याचे आवाहन यावेळी अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी कार्यकर्त्यांना केले. दरम्यान, सरकारवर दबाव गट निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हास्तर व तालुकास्तरीय संघटन बांधणीचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासंबंधी काही कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

यावेळी जनआंदोलनाचे विश्वस्त डॉ बालाजी कोपलवार, अशोक सब्बन, श्याम आसावा, अल्लाउद्दीन शेख, अ‍ॅड. अजित देशमुख, माजी सरपंच लाभेश औटी, संजय पठाडे आदी उपस्थित होते. शिवाजी खेडकर, शाम पठाडे, संदीप पठारे, अन्सार शेख, रामदास सातकर, दत्ता आवारी आदींनी बैठक यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या राज्यातील निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर विश्वस्त मंडळाची बैठक झाली. यामध्ये संघटन बांधणीसाठी जिल्हावार व विभागानुसार दौरे करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच जिल्ह्यातील करोना बाधित कार्यकर्त्यांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधण्याचे ठरले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com