युपीएससीद्वारे अंकुश डांगे पोलीस उपअधीक्षकपदी

युपीएससीद्वारे अंकुश डांगे पोलीस उपअधीक्षकपदी

कोर्‍हाळे (वार्ताहर) -

राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे या गावचे शेतकरी कुटुंबातील अंकुश सुभाष डांगे यांनी युपीएससी परीक्षेत भारतात 97 क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने

त्याची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली. कोर्‍हाळे गावच्या शिरपेचात नावलौकिकात मानाचा तुरा रोवल्याने ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिर्डीचे डीवायएसपी संजय सातव, उपसरपंच ज्ञानेश्वर डांगे, मेजर विलास थोरात तसेच अंकुशचे आई-वडील सुभाष डांगे, मथुरा डांगे व चुलते रामकृष्ण डांगे उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने डीवायएसपी संजय सातव तसेच कोर्‍हाळे गावचे भूमिपुत्र भारतीय सैन्य सैन्यदलातून निवृत्त झाल्याने विलास थोरात तसेच नुकतीच पीएचडीसाठी निवड झाल्याने अक्षय थोरात यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कोर्‍हाळे येथील शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड व्ही. टी., बाळासाहेब थोरात, संतोष बनसोडे, विलास डांगे, राजू कोळगे, तुकाराम डांगे, संजय हेकरे, राजू कुलकर्णी, कृष्णा मुर्तडक, किशोर ढगे, भरत डांगे, शिवाजी डांगे, सुधीर डांगे आदींसह न्यू इंग्लिश स्कूल स्कूलचे शिक्षक वृंद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com