
नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa
नेवासा येथे काल गुरुवारी सकाळी 8 गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करतानाचा टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला असून याबाबत दाखल फिर्यादीवरून औरंगाबादच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सचिन गणगे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, गुरुवार 1 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नेवासा शहरातील गणपती चौक येथे गोवंश जातीची 8 जनावरे निर्दयतेने बांधून दाटीने कोंबवून कत्तल करण्यासाठी औरंगाबादच्या दिशेने चाललेला टेम्पो मिळून आला. साडेतीन लाख रुपये किंमतीचा अशोक लेलण्ड टेम्पो (एमएच 20 ईएल 7833) तसेच त्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची 8 जनावरे (1 लाख 46 हजार 100) जप्त करण्यात आली.
याबाबत अबाज हुसेन कुरेशी, मुसेफ अमजद कुरेशी व सलीम सद्दाम कुरेशी सर्व रा. सिल्लीखाना, बेगमपुरा औरंगाबाद या तिघांवर गुन्हा रजिस्टर नं. 1094 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 5(अ), (ब) सह प्राण्यांचा छळ अधिनियम 11(1) (एच) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार तुळशीराम गिते करत आहेत.