जनावरांवर लम्पी रोग उपचारादरम्यान प्रतिजैविकांचा वापर टाळा

केंद्रीय पथकाची जिल्ह्यातील पशूसंवर्धन विभागाला सुचना

संगहीत चित्र
संगहीत चित्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जनावरामधील लम्पी हा विषाणूजन्य रोग आहे. गोवंशी जनावरे आणि बैलाला लम्पीची बाधा झाल्यानंतर त्याला पहिल्या आठ दिवसात इंजेक्शनव्दारे देण्यात येणारी प्रतिजैविक औषधे टाळा, ते देवूच नका. त्याऐवजी सकस चारा, शूध्द पाणी, जीवनसत्व असणारी औषधे द्या, अशी सुचना केंद्राच्या पशूसंवर्धन विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील पशूसंर्वधन विभागाला दिल्या.

जिल्ह्यातील वाढत्या लम्पी प्रकोपाची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पशूसंवर्धन विभागाच्या पथकाने कर्जत आणि राशीनला भेट दिली. जिल्ह्यात सर्वाधिक लम्पीचा उद्रेक या तालुक्यात आहे. केंद्राच्या पशूसंवर्धन विभागाचे विभागीय आयुक्त पशूसंवर्धन नवी दिल्ली येथील डॉ. विजय कुमार आणि बेंगलोर येथील पशूसंवर्धन विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मंजूनाथ रेड्डी यांचा पथकात समावेश होता. या दोघांनी प्रतिनिधीकत्व स्वरूपात कर्जत तालुक्यातील लम्पीग्रस्त जनावरे आणि त्यांच्यावर सुरू असणार्‍या उपचारांची माहिती घेतली.

त्यानंतर जिल्ह्यातील पशूसंवर्धन विभागाला सुचना देतांना लम्पीला रोखण्यासाठी तीन गोष्टींवर भर देण्यास सांगितले. यात लसीकरण करणे, गोठा आणि बाधित जनावरे असणार्‍या गावात, गोठ्यात जंतू आणि कीटकनाशकांची फवारणी करणे, दर आठ दिवसांनी फॉगिंग करणे, जनावरांचे व्यवस्थापन करणे यात स्वच्छ गोठा, सकस आणि मुबलक चारा आणि जनावरांना शुध्द पाणी देणे यावर भर द्यावा.

तसेच त्यांना पहिल्या दिवसापासून इंजेक्शनव्दारे देण्यात येणारी प्रतिजैविक औषधे टाळा, ते देवूच नका. त्याऐवजी सकस चारा, शूध्द पाणी, जीवनसत्व असणारी औषधे द्यावा, यामुळे जनावरे लवकर लम्पी रोगातून मुक्त होती, असा विश्वास केंद्राच्या पथकाने व्यक्त केला. यावेळी पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर, सहायक आयुक्त पशूसंवर्धन, विभागीय रोगनिदान प्रयोग शाळा पुणे डॉ. सुनील लहाने यांच्या पशूसंर्वधन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com