नगरकरांना वाढला मोकाट जनावरांचा त्रास

शहरातील अनेक मार्गांवर जनावरांचा वावर
नगरकरांना वाढला मोकाट जनावरांचा त्रास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेकडून वेळोवेळी जनावरे पकडण्याची मोहीम राबवली जाते. तरीही नगर शहरातील अनेक मार्गांवर सध्या मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या प्रश्नी महापालिकेने ठोस पावले उचलण्याची मागणी नगरकरांकडून होत आहे.

नगर शहरातील अनेक मार्गांवर मोकाट जनावरे फिरताना दिसून येतात. शहरातील आपुहत्ती चौक, बंगाली चौक, पत्रकार चौक, अमरधाम परिसर त्याचबरोबर सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आहेत. रस्त्याचा मध्यभागी ही जनावरे ठाण मांडून बसतात. यामुळे येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण होतो. वाहतुकीची कोंडी होते.

मोकाट जनावरांच्या अडथळ्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त होत आहे. अनेकदा जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसल्यामुळे अपघातही होतात.दरम्यान मनपास्तरावरून वेळोवेळी जनावरे पकडण्याची मोहीम राबवली जात असल्याचा दावा केला जातो. परंतु, आजही रस्त्यावर जनावरे मोकाट फिरताना दिसून येत आहेत. याप्रश्नी मनपा प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी नगरकरांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com