शेवगावचा जनावरांचा बाजार बंद

लम्पीचा प्रार्दुभाव || जिल्हाधिकार्‍यांचा आदेश
शेवगावचा जनावरांचा बाजार बंद

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या पशूधनावर लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने व हा रोग विषाणूजन्य संसर्गजन्य रोग असल्याने रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशान्वये शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दर रविवारी भरणारा जनावरांचा मुख्य बाजार रविवार (दि.27) आजपासून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ यांनी दिली.

त्याचप्रमाणे बोधेगाव येथील उपबाजार प्रांगणात प्रत्येक गुरुवारी भरणारा जनावरांचा गाय, बैल, म्हैस, आठवडे बाजार बंद राहणार असल्याची माहिती सभापती कसाळ यांनी दिली. मात्र, शेळी, मेंढीचे आठवडे बाजार नेहमी प्रमाणे सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवगाव तालुक्यात शेतकर्‍यांच्या पशुधनावरील लम्पी स्किन डिसिज रोगाचा प्रादुर्भाव दुसर्‍या टप्प्यात झपाट्याने वाढत आहे.

आजअखेर जवळपास 500 जनावरांना त्याची बाधा झाली असून संपूर्ण अहमदनगर जिल्हा बाधित क्षेत्र व सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाजार समितीच्या शेवगाव केंद्रावरील प्रत्येक रविवारी भरणारा व तालुक्यातील उपप्रत्येक गुरुवारी भरणारा जनावरांचा आठवड्या बाजार पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद राहणार आहे, शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन बाजार समिती सहकार्य करण्याची आवाहन सभापती कसाळ, उपसभापती गणेश ठोंबरे सचिव अविनाश मस्के, सहसचिव मुदस्सर शेख यांनी केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com