पशुसंवर्धन विभागातील भरती प्रक्रिया रद्द

File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारने 13 हजार 521 पदांची जिल्हा परिषदेची भरती रद्द केली होती. त्यापाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागाची भरती रद्द करण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

2017 आणि 2019 मध्ये राज्यात पशुसंवर्धन (गेली) विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. पशुसंवर्धन आयुक्तलांतर्गत सरळसेवा कोट्यातील गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतआधी 2017 आणि नंतर मार्च 2019 रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

पशुवसंर्धन विभागातील 723 पदांसाठी ही जाहीरात काढण्यात आली होती. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. दरम्यान, पैसे भरून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जही भरले होते. गेल्या चार वर्षांपासून या भरतीप्रक्रियाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर जिल्हा परिषदेप्रमाणे शासनाने ही भरतीही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com