पशुपालकांसाठी ‘किसान कार्ड’ ची सुविधा

सभापती गडाख: 76 हजार पशुपालकांना मिळणार लाभ
पशुपालकांसाठी ‘किसान कार्ड’ ची सुविधा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील पशुसंवर्धन व्यवसाय (Animal Husbandry Business) करणार्‍या पशुपालकांसाठी जिल्हा परिषदेकडून (Zilla Parishad) किसान कार्ड (Kisan Card) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी 15 नोव्हेंबर 2021 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान प्रत्येक शुक्रवारी तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत (Department of Animal Husbandry) अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत 76 हजार 438 पशुपालकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख (Speaker Sunil Gadakh) यांनी केले आहे.

बुधवारी सभापती गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंर्वधन समितीची सभा पार पडली. यावेळी सदस्य संध्या आठरे, सोनाली रोहमारे, शांताबाई खैरे, दिनेश बर्डे, वंदना लोखंडे, रावसाहेब कांगुणे, सुनिता दौड, उर्मिला राऊत, राजश्री मोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुकुंद राजळे आदी उपस्थित होते. केंद्र शासनाने पीक कर्ज सवलती प्रमाणेच पशुपालकांसाठी किसान कार्ड सुविध उपलब्ध करून दिलेली आहे. या योजने अंतर्गत पशुपालकांना एक लाख 60 हजार रूपये पर्यंत जनावरांचा चारा, औषधे, लसमात्रा, पशुखाद्यांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे.

ही सुविधा दुग्धव्यवसाय, कुक्कटपालन, मत्सव्यावसाय, शेळी पालन, मेंढीपालन व वराह पालन या व्यवसायांसाठी उपयोगी ठरणार आहे. या योजने अंतर्गत सात टक्के दराने कर्ज उपलब्ध होणार असून शासनामार्फत दोन टक्के व्याज सवलत दिली जाणार आहे. पशुपालकाने नियमित कर्जफेड केल्यास ज्यादाची तीन टक्के सवलत मिळणार आहे. सदर योजनेबाबत विस्तृत माहीती व मार्गदर्शन नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे कार्यालयात संपर्क साधावा, असे आव्हान सभापती गडाख यांनी केले आहे.

मागील महिन्यात थंडीच्या लाटेत मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. याचा आढावा बुधवारी झालेल्या पशुसंवर्धन सभेमध्ये घेण्यात आला. पशुपालकांना लवकरात लवकर मदत देण्याच्या सूचना सभापती गडाख यांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com