वायदेबाजार बंदी न उठवल्यास सेबी कार्यालयासमोर आंदोलन

स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष घनवट यांचा इशारा
अनिल घनवट
अनिल घनवट

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

एक वर्षांपूर्वी सेबीने ज्या शेतीमालाला वायदेबाजारात व्यापार करण्यास बंदी घातली होती. त्यास आणखी एक वर्षाची मुदतवाढ देऊन शेतकर्‍यांची नुकसान केले आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली शेतीमालाचे भाव पडण्याचे हे कारस्थान आहे. सेबीने वायदेबाजारबंदीची मुदतवाढ मागे न घेतल्यास सेबीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्षअनिल घनवट यांनी निवेदनद्वारे दिला आहे.

प्रसिद्धस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, देशातील महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी सेबीने मागील वर्षी टप्प्या टप्प्याने सात शतीमाल वायदे बाजारातून वगळले होते. डिसेंम्बर 2022 मध्ये या बंदीची मुदत संपेल व पुन्हा वायदेबाजारातील व्यापार सुरळीत सुरू होईल अशी अपेक्षा होती मात्र 20 डिसेंबर 2022 रोजी सेबीने आदेश काढून सात शेतीमलांवरील वायदेबाजारबंदीला 20 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. बिगर बासमती तांदूळ, गहू, हरभरा, मूग, सोयाबीन व उपपदार्थ, मोहरी व तिचे उपोदार्थ आणि कच्चे पाम तेल या सात शेतीमालाचा यादीत समावेश आहे.

वायदेबाजार बंदी ही फक्त शेतीमालाचे दर पाडण्यासाठीच केली गेली आहे. शेतमालाचे दर वाढले की वायदेबाजारबंदी मात्र भाव पडले तर काहीच उपाय योजना केली जात नाही. हरभर्‍याचे दर गेली वर्षभर आधारभूत किमती पेक्षा कमी राहिले आहेत. तरी सुद्धा त्याच्या वायद्यांवर बंदी कायम आहे. आता रब्बी हंगामातील पिके बाजारात येण्याच्या वेळेस बंदी घातल्यामुळे गहू, मोहरी, हरभर्‍याचे दर कमीच रहातील. हा शेतकर्‍यांवर अन्याय आहे. सेबीने तातडीने दिलेली एक वर्षाची मुदतवाढ त्वरित मागे घ्यावी. अन्यथा सेबीच्या मुंबई येथील कार्यालय समोर शेतकरी, व्यापार्‍यांसह बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा घटनवट यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com