काय तो रस्ता,काय तो चिखल! राहात्यात संतप्त नागरिकांचं चिखलात बसून आंदोलन

काय तो रस्ता,काय तो चिखल! राहात्यात संतप्त नागरिकांचं चिखलात बसून आंदोलन

राहाता l वार्ताहर

शहरातील चाणखण बाबा ते १५ चारी रस्त्याची दुरावस्था झाल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी चिखलात बसून आंदोलन केले.

या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाला अनेकदा रास्ता दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने कुठलीही दाखल न घेतल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी चिखलात बसून आंदोलन केले.

यावेळी नागरिकांनी रस्ता दुरुस्ती होत नाही तोपर्यंत नगर परिषद निवडणुकीत मतदान न करण्याचा व कुठलाही कर न भरण्याचा निर्धार केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com