अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 15 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 15 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करीत आहेत. वारंवार आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार कर्मचार्‍यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाच्या या धोरणामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. मंगळवार दि. 15 नोव्हेंबर रोजी अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृति समितीच्यावतीने मंत्रालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे.

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ व्हावी, मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा पेन्शन मिळावी, सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशा प्रमाणे ग्रॅचूटीची रक्कम सेवा समाप्ती नंतर मिळावी, निवृत्त कर्मचार्‍यांना सेवा समाप्ती लाभाची रक्कम मिळावी, पोषण ट्रॅक ची सक्ती करु नये, सर्व थकित रक्कमा मिळाव्यात, अंगणवाडी खाजगीकरण विरोध इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्रातील हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत. सरकारने मागण्या मान्य न केल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय कृति समितीने जाहीर केला आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य अध्यक्षा अ‍ॅड. निशाताई शिवूरकर यांनी दिली आहे.

या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आझाद मैदान मुंबई येथे जमावे, असे आवाहन अहमनगर जिल्हा अध्यक्ष सत्यभामा तिटमे, सरचिटणीस शांताराम गोसावी, भारती धरत, पूजा घटकर, बेबी हरणामे, इंदुमती घुले, सुनंदा राहणे, सुनंदा कदम, कमल खेमनर, समिना शेख आदींनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com