अंगणवाडी सेविकांचा बालविकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

अंगणवाडी सेविकांचा बालविकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

राजूर |वार्ताहर| Rajur

अंगणवाडी कृती समितीच्यावतीने देशव्यापी बेमुदत संप पुकारला असून अंगणवाडी सेविका संपावर जाणार असल्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी अंगणवाडी सेविकांनी मोठ्या संख्यने हजेरी लावत राजूर बालविकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेत निदर्शने केली.

नवीन मोबाईल मिळावे, मोबाईलची सर्व भाषा मराठी पाहिजे मराठी अ‍ॅप असल्याशिवाय मुलांची माहिती मोबाईलमध्ये भरणार नाही, अकोले व राजूर प्रकल्पात अमृत आहाराचे थकीत असलेले बिल लवकर मिळावे. अकोले व राजूर प्रकल्पात अंडी व केळीचे थकीत बिल मिळावे, सेविका मदतनीसांच्या रिक्त जागा लवकर भराव्यात मोबाईलचा सी.बी. एचा भत्ता थकीत मिळावा.

मिनी अंगणवाडी सेविकांच्या अंगणवाड्या मोठ्या अंगणवाड्यामध्ये रुपांतर व्हावे मोबाईलचा थकीत रिचार्ज मिळावा, रजिस्टर संपले आहे नवीन रजिस्टर मिळावे, थकीत इंधन बिल लवकरात लवकर मिळावे. सादिल खर्चात 2 हजारांहून 5 हजार रुपये मिळावे, सेवा समाप्तीची पेन्शन दरमहा मिळावी, की टी.ए. बिल मिळावे आदी मागणीचे निवेदन बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती साताळकर यांना देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा अ‍ॅड. निशाताई शिवूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष सत्यभामा तिटमे, राजूर गट नियोजित अध्यक्ष पूजा घाटकर, रेखा सोनवणे, सोनूताई तळपाडे, सुनंदा मोरे, अनुसया वराडे, रतन सोनवणे, शेवंताबाई मेमाणे, सुनंदा मोरे, लंकाताई आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. यावेळी राजूर पोलीस स्टेशन चे सहा. पो. नि गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पो. कॉ. अशोक गाडे, पो. कॉ. सुनील फटांगरे, पो. ना. श्रीमती वाडेकर आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com