प्रलंबीत मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे

जोरदार घोषणांनी जिल्हा परिषद दणाणली
प्रलंबीत मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मानधन वाढ, शासकीय सेवेत समावून घ्यावे व दरमहा पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ नगर जिल्ह्याच्यावतीने अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेत बुधवारी दुपारी धरणे आंदोलन केले. अंगणवाडी सेविका महिलांनी जोरदार घोषणाबाजी व निदर्शनाने संपूर्ण परिसर दणाणून निघाला.

प्रलंबीत मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे
पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागा भराव्यात - परजणे

अंगणवाडी कर्मचार्‍यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, महागाईच्या काळात त्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. करोना काळात देखील त्यांनी उत्तमपणे कर्तव्य बजावून योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या प्रलंबीत मागण्या पूर्ण करण्याची अपेक्षा संघटनेच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. शासन स्तरावरील प्रश्न त्वरीत न सुटल्यास 20 सप्टेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानात राज्यव्यापी आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शांता गोरे, जिल्हा कार्याध्यक्षा सुनीता कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष विजय घोडके, जिल्हा सचिव सुरेखा विखे, शोभा लोहकरे, छाया शिंदे, सुनीता दुग्गल, मंगल ढगे, पूजा गाडेकर, शोभा तरोटे, राज्य उपाध्यक्ष कॉ. निलेश दातखिळे, एस.आर. तरोटे आदींसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

प्रलंबीत मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे
विखे पाटील यांच्याकडून ‘निळवंडे’चा आढावा

अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरमहा पेन्शन योजना लागू करावी, अंगणवाडी कर्मचार्‍यांना इतर राज्य सरकार प्रमाणे मानधनात वाढ द्यावी, गरम ताजा आहारातील दरवाढ व इंधन दर वाढवून द्यावा, गहू भरडण्याची सक्ती ताबडतोब बंद करावी आदी मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या मागणीचे निवेदन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ससे यांना देण्यात आले. त्यांनी अंगणवाडी सेविकांचे स्थानिक पातळीवरील प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन देऊन वरिष्ठ पातळीवरील मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्याचे स्पष्ट केले.

प्रलंबीत मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे
अखेर झेडपीची ‘त्या’ तोतयाविरोधात कोतवाली पोलिसांत तक्रार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com