
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यातील अंगणवाडीला पुरवला जाणारा गहु निकृष्ट दर्जाचा आला असल्याचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब हाके यांना देण्यात आले.
तसेच निवेदनात करोनाचा काळ कमी झाल्यामुळे अंगणवाडीत मुले यायला लागली त्यांना पोषण आहार देण्यात येतो तोच पुरवठा ठेकेदाराने खराब निकृष्ट गहू पुरवठा केला आहे. गेले आठ ते पंधरा दिवस झाले पुरवठादाराने माल पुरवठा केला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी अकोले भाऊसाहेब हाके व राजुर प्रकल्प अधिकारी भारती साताळकर यांना माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले की अजून पर्यवेक्षिका (सुपरवायझरने) माहिती दिली नाही ती मिळाल्यावर सांगू.
तसेच अंगणवाडी सेविकांना एकतर मानधन कमी गॅस टाकी भरण्यासाठी 1000 ते 1100 रुपये लागतात. प्रत्यक्ष मात्र एका मुला मागे 65 पैसे मिळतात. गॅस टाकी भरण्यासाठी एवढे पैसे आणायचे कोठून. तांदूळ, हरभरा, गहू, मसूर, चनाडाळ, गूळ, तेल, हळद पावडर, मिरची पावडर इत्यादी कच्चा कोरड आहार पुरवला जातो. सदर माल देतेवेळी संबंधित ठेकेदार ट्रक मधील वजनकाट्यावर मोजून देतो, परंतु अंगणवाडी सेविका या खाली असतात. येथेही वजनात काटा मारतात.
बर्याच वेळा तांदुळाचा व गव्हाचा कट्टा वजन न करता दिला जातो. त्यामुळे वजन योग्य आहे की नाही हे जाणून घेता येत नाही. तशाच त्याच्या स्वाक्षर्या घेतल्या जातात. ही बाब ग्राहक पंचायतने अकोले व राजूर या अधिकार्यांना पत्र देऊन निदर्शनास यापूर्वीही आणून दिले. पण त्याकडेही अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे अशी माहिती ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी दिली.