शेतात आढळला जुना बॉम्ब, जमिनीवर आपटताच झाला स्फोट, दोन जखमी

शेतात आढळला जुना बॉम्ब, जमिनीवर आपटताच झाला स्फोट, दोन जखमी

नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडली घटना

अहमदनगर|Ahmedagar

शेतामधील वस्तीवर मुरूम टाकण्यात आला. या मुरूमात पिन असणारा जुन्या काळातील बॉम्ब आढळून आला. तो बॉम्ब युवकाने जमिनीवर आपटला असता त्याचा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला व एक तरूण जखमी झाले आहेत.

नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारात बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या शेतामध्ये ही घटना घडली. मंदाबाई फुंदे व अक्षय साहेबराव मांडे यात जखमी झाले असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.

Title Name
नगरमधील ’त्या’ ऑक्सिजन प्लँटवर होतेय गर्दी व गोंधळ
शेतात आढळला जुना बॉम्ब, जमिनीवर आपटताच झाला स्फोट, दोन जखमी

नगर तालुक्यातील नारायणडोह येथे गावापासून दूर असणार्‍या बाबासाहेब फुंदे यांच्या वस्तीवर रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. या मुरुमात पिन असणारा जुन्या काळातील बॉम्ब आढळून आला. काहीतरी वस्तू समजून मंदाबाई यांनी तो बॉम्ब गोळा हातात घेतला. जवळच असलेल्या अक्षय मांडे यांच्याकडे दिला. त्यांनी तो बॉम्बगोळा जमीनीवर आपटला. यावेळी मोठा स्फोट झाला.

यात, अक्षय व मंदाबाई फुंदे हे दोघे जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह भेट दिली. यानंतर घटनास्थळाची बॉम्ब शोधक पथकाने पाहणी केली. या गावाच्या परिसरात अजून काही बॉम्ब आहेत का ? याची तपासणी बॉम्बशोधक पथकाने केली आहे. मात्र इतर ठिकाणी बॉम्ब आढळून आलेला नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com