अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील काही आमदारांनी पैशाचे आमिष दाखवून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची

आचारसंहिता भंग झाली आहे. यामुळे संबंधीत आमदारांची चौकशी करून त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यानूसार बिनविरोध होणार्या ग्रामपंचायतींची चौकशी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे बारसे यांनी 26 डिसेंबराला ऑनलाईन आणि जिल्हाधिकार्यांकडे पत्रावद्वारे 28 डिसेंबरला बारसे यांनी तक्रार केली होती. राज्य निवडणूक आयोगाने बारसे यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानूसार पारनेर तालुक्याचे निवडणूक निरिक्षक तथा दिंडोरीचे उपविभागयी अधिकारी संदीप आहेर हे आज पारनेरला चौकशीसाठी येणार असून मला देखील चौकशीला हजर राहण्यास सांगितले असल्याचे आरसे यांनी सांगितले.

दरम्यान, पैशाचे आमिष दाखून ग्रामपंचायत बिनविरोध करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार केवळ पारनेर पुर्ती मर्यादीत नसून कर्जत-जामखेडमध्ये आ. रोहित पवार, श्रीगोंद्यात आ. बबनराव पाचुपते, पारनेरमध्ये आ. नीलेश लंके आणि अकोल्यात आ. डॉ. किरण लहाूमटे यांनी पैशाची घोषणा केली होती. यामुळे या सर्व ठिकाणी बिनविरोध होणार्या ग्रामपंचायतींची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा बारसे यांनी व्यक्त केली आहे.