बेलापूर (वार्ताहर) -

येथील एका अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला पळविण्याचा प्रयत्न मुलीच्या हुशारीमुळे फसला असला

तरी, या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

भागवतनगर, बेलापूर येथे राहणारी मुलगी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान आपल्या आईसोबत घरी येत होती. घरासमोर आल्यावर आई घराचा दरवाजा उघडत असतानाच एक मुलगा अचानक आला व त्याने आई समोरच मुलीचे तोंड दाबले. मुलीने प्रसंगावधान राखून तोंड दाबलेल्या हाताला कडकडून चावा घेतला. त्यामुळे त्याने मुलीला सोडून पळ काढला.

ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सदर कुटुंब भयभीत झाले आहे. दरम्यान,उपसरपंच अभिषेक खंडागळे, शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी संबधीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.