आ.आव्हाड प्रकरणी महिला आयोग न्याय देईल !

अमृता फडणवीस यांचा विश्वास
अमृता फडणवीस
अमृता फडणवीस

लोणी |वार्ताहर| Loni

राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Avhad) यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या विनयभंगाच्या (Molestation) गुन्ह्यात राज्य महिला आयोग (State Commission for Women) व इतर न्याय व्यवस्था योग्य निर्णय करतील असा विश्वास (Faith) अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी व्यक्त केला.

लोणी ता. राहाता (Loni) येथे जनसेवा फाउंडेशनने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. विविध प्रश्नांची उत्तरे देताना त्या म्हणाल्या आजपर्यंत महिला आयोगाच्या अध्यक्ष राजकीय पक्षांच्याच व्यक्ती राहिलेल्या आहेत. त्यांच्याकडून महिलांना योग्य न्याय मिळेल. भारतात एक देश एक निवडणूक असावी या मताची मी आहे असे त्यांनी सांगितले. तर जनसेवा फाउंडेशन मार्फत महिला बचत गट उत्पादित करीत असलेली विविध उत्पादने दर्जेदार आहेत.

शालिनीताई विखे पाटील (Shalinitai Vikhe Patil) यांनी महिलांना रोजगार आणि न्याय दिला आहे. हे सॅनिटरी नॅपकिन ग्रामीण व खेड्यात राहणार्‍या महिलांपर्यंत विशेषतः ज्या महिला वापर करीतच नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकारने मदत करण्याची गरज आहे. प्रवरेतील महिला बचत गटांचे काम इतरांना ऊर्जा देणारे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com