स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत पुणतांब्यात विशेष बैठक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत पुणतांब्यात विशेष बैठक

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारत सरकार व सांस्कृतिक मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त नियोजन बैठकीचे आयोजन केलेले होते.

सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सर्व शाळेतील प्राचार्य व मुख्याध्यापक किंवा शाळेचा प्रतिनिधी यांना मार्गदर्शनपर सूचना केल्या. प्रत्येक शाळेने आपापल्या विद्यालयांमध्ये ध्वजारोहन वेळेतच करावे. प्रत्येक शाळेने गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, निवृत्त सैनिक, निवृत्त शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य यांना आवर्जुन निमंत्रित करावे. अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा कर्मचारी यांनी घरोघर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक द्यावा व त्यांना मार्गदर्शन पर सूचना द्याव्यात.

भारत सरकार आजादी का अमृत महोत्सव स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करत आहे. त्यादृष्टीने 13 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपासून 15 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक पुणतांबेकरांनी घरावर भारतीय ध्वज हा सन्मानपूर्वक प्रत्येकाने फडकवावा. ध्वज फडकवताना सर्व काळजी घ्यावी. तिरंगा कोठेही फाटलेला, चुरगळलेला, नसावा. कोठेही राष्ट्रध्वजाचा अपमान होता कामा नये. भारतीय संहितेचे उल्लंघन होता कामा नये याची सर्वांनी काळजी घ्यावी.

प्रत्येकास घरोघरी भारतीय तिरंगा ध्वज विकत मिळणार आहे. सर्व शाळांनी वयोगटानुसार देशभक्तीपर व माझी वसुंधरा या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करावे. त्यातील उत्तम स्पर्धक निवडावे. सर्व शाळेचे सामूहिक ध्वजारोहण मराठी मुलींची शाळा या ठिकाणी होणार आहे. शाळेने 15 ऑगस्ट रोजी गावातून वाजत गाजत तिरंगा ध्वजासह प्रभात फेरी काढावी. मराठी मुलींची शाळा याठिकाणी इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे होणार आहेत. काही निवडक उत्कृष्ट देशभक्तीपर गीत सादरीकरण होणार आहे. गावकर्‍यांसाठी धनवटे वेस येथे संध्याकाळी 5 वाजेनंतर बाल गोपालांचा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे डॉ. धनवटे यांनी सांगितले.

या नियोजन बैठकीला रयत हायस्कूलचे प्रतिनिधी म्हणून ए. एम. मोरे, रूरल हायस्कूलचे प्राचार्य अशोक ओहळ, लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य एस. ए. पटारे, मेथाडिस्ट प्रायमरी स्कूलचे प्राचार्य प्रदीप विधाते, योगीराज चांगदेव महाराज हायस्कूलचे प्रतिनिधी बर्गे, ग्रामसेवक प्रमोद कानडे, उपसरपंच महेश चव्हाण, मनोज गुजराथी, अमोल सराळकर, संदीप धनवटे, शैलेश कुलकर्णी, व्ही. पी. जाधव, अंगणवाडी सेविका व मदतनीस, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com