धक्कादायक! शिर्डीला सहलीला आलेल्या विद्यार्थांना विषबाधा, तब्बल शंभर मुले रूग्णालयात

धक्कादायक! शिर्डीला सहलीला आलेल्या विद्यार्थांना विषबाधा, तब्बल शंभर मुले रूग्णालयात

शिर्डी | प्रतिनिधी

शिर्डीतून एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

रात्री जेवण केल्यानंतर अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास १०० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

धक्कादायक! शिर्डीला सहलीला आलेल्या विद्यार्थांना विषबाधा, तब्बल शंभर मुले रूग्णालयात
'पृथ्वी शॉ'बरोबर भररस्त्यात हाणामारी करणारी 'सपना गिल' आहे तरी कोण?

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथिल आदर्श हायस्कूल येथील हे विद्यार्थी आहेत. दोन दिवसापासून ते सहलीसाठी निघले होते. शिर्डीत येण्यापुर्वी दुपारचे जेवन केले. त्यानंतर साई बाबांचे दर्शन घेतले. रात्री देवगड येथे मुक्कामी निघले असताना मुलांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. यातील काही विद्यार्थांना अधिक त्रास जाणवत होता. त्यामुळे शिक्षकांनी सर्व मुलांना रात्री शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यातील काही मुलांना ताप, थंडी सारखे प्रकार देखिल दिसून आले. त्यामुळे खबरदारी म्हणून रुग्णालयाने सर्व विद्यार्थांना देखरेखी खाली ठेवले आहे. मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व बाधित मुलांना सध्या रुग्णालायत दाखल ठेवले आहे. सहलीत २२७ विद्यार्थी आहेत. यातील शंभर मुलांना त्रास झाला आहे. तर काही शिक्षकांना देखिल अन्न विषबाधा सारखी लक्षणे जाणवल्याने त्यांना ही उपचारासाठी दाखल केले आहे.

धक्कादायक! शिर्डीला सहलीला आलेल्या विद्यार्थांना विषबाधा, तब्बल शंभर मुले रूग्णालयात
BCCI चे चिफ सिलेक्टर चेतन शर्मांचा अखेर Game Over

दरम्यान, मुलांनी बाहेर कुठे काही खाल्ले नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. जेवन तयार करण्याची सामुग्री सोबतच असल्याचे सांगितले जात आहे. तर पाणी बदलामुळे उलट्या सुरु होवून फूड पॉइजनींग सारखा प्रकार असल्याचे शिक्षक सांगत आहेत.

धक्कादायक! शिर्डीला सहलीला आलेल्या विद्यार्थांना विषबाधा, तब्बल शंभर मुले रूग्णालयात
SSC HSC Exam : दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी, वेळेत झाला मोठा बदल
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com