
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
अमेरिका येथील पर्यावरणाचे अभ्यासक तथा ओरिगॉन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर अँन्ड्रयु मिल्सन व त्यांच्या पत्नी या दाम्पत्याने पारनेर तालुक्यातील पाणीदार गावांना भेट देत येथील पाणी फऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली.
सर्व गावांमध्ये डॉ. मिल्सन यांचे टाळ मृदुंग, ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक लेझीम नृत्य करत स्वागत करण्यात आले. या पारंपारिक स्वागताने ते भारावून गेले. त्य ांनी नांदूर पठार व पिंपरी जलसेन येथील गावांना भेटी देऊन दोन्ही गावातील झालेली जलसंधारणाची कामे, पीक पद्धती पाहून त्यांनी कौतुक केले. पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून दोन्हीही गावात झालेले जलसंवर्धन व कृषी क्षेत्रातील अमुलाग्र बदल याची पाहणी करण्यासाठी अमेरिकेचे पाहुणे आले हे गावासाठी कौतुकास्पद असल्याचे डॉ. पोळ यांनी सागीतले.
दोन्हीही गावांनी सातत्य राखत पाणी फाउंडेशन च्या वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग घेत आपापली गावे समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. गावांची एकी यासाठी बळ देत आहे. शास्त्रज्ञ डॉक्टर अँन्ड्रयु मिल्सन यांनी सांगितले पाणी फाउंडेशन चे काम पाहण्यासाठी आपल्या गावी आलो आहे पाणी आल्यानंतर पाण्याचा उपयोग करून येथील शेतकर्यांनी कशा पद्धतीने शेती फुलवली आहे हे पाहण्यासाठी आपल्या गावांना भेट दिली.
यावेळी पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ, गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, शेतकरी गट, महिला गट, गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती अभिजीत गोडसे यांनी दिली.