मनपा कामगारांनी मागण्या मान्य न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा

मनपा कामगारांनी मागण्या मान्य न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणार्‍या महानगरपालिकेच्या कामगारांचे वेतन आणि पेन्शनचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यशासन यासंदर्भात बेफिकीर आहे. तसेच करोना बाबतही शासनाकडून कर्मचार्‍यांची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांनी केला आहे.

कॉ. लोखंडे यांनी याबाबत मनपा आयुक्त शंकर गोरे व महापौर बाबासाहेब वाकळे यांना निवेदन दिले आहे. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 27 एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा कॉ. लोखंडे यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, करोनाच्या संकटात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महानगरपालिकेचे कामगार राबत आहे. या कामगारांना सॅनिटायझर, मास्क, जम बूट आदीं सुविधा तातडीने द्याव्यात.

कामगार, त्यांच्या घरातील व्यक्ती कोणी आजारी असेल तर त्वरित बेड, ऑक्सिजन, रेमडिसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावेत. वेतन आणि पेन्शन मिळत नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यशासनाच्या नवीन नियमानुसार कार्यालयीन कामगारांची 15 टक्के आणि अत्यावश्यक सेवेतल्या कामगारांची 50 टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत कार्यालयीन आदेश देण्यात यावेत, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com