छिंदमच्या प्रभागात पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू

छिंदमच्या प्रभागात पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू

12 मार्चला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे पद रद्द ठरविण्यात आले होते.

त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने रिक्त झालेल्या त्या प्रभागात पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मंगळवारी राज्यातील महापालिकांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये नगरमधील 9 (क) या प्रभागाचाही समावेश आहे.

16 फेब्रुवारीला प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 16 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येतील. 3 मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 8 मार्चला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 12 मार्चला अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध होणार आहेत.

त्यामुळे एप्रिल महिन्यात या प्रभागात पोटनिवडणूक होऊन नवीन नगरसेवक निवडला जाऊ शकतो. विविध कारणांमुळे नगरसेवकांचे पद रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र, महापुरूषांचा अवमान केल्याबद्दल पद जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर छिंदम आपल्या भागातून पुन्हा अपक्ष म्हणून निवडून आला होता. महाविकास आघाडी सरकारने त्याचे मागील पद रद्द करताना नवे पदही रद्द केले. त्यामुळे तेथे आता पोट निवडणूक होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com