मनपाच्या पाणी पुरवठा कर्मचार्‍याला मारहाण

मनपाच्या पाणी पुरवठा कर्मचार्‍याला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कमी दाबाने पाणी सोडल्याचा आरोप करीत चौघांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा कर्मचार्‍याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. बोल्हेगावातील गांधीनगरमध्ये शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. कर्मचारी गणेश मारूती गव्हाणे (वय 30 रा. वडगाव गुप्ता ता. नगर) हे जखमी झाले आहेत.

जखमी गव्हाणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणार्या चौघांविरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विकी बोरा, रत्ना विकी बोरा, देवराम शेवाळे, शोभा देवराम शेवाळे (सर्व रा. अंंधाळे चौरे कॉलनी, गांधीनगर, बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. शुक्रवारी पहाटे कर्मचारी गव्हाणे अंधाळे चौरे कॉलनीमध्ये पाणी सोडण्यासाठी गेले.

त्यांनी पाणी सोडल्यावर आरोपी तेथे आले. आमच्या कॉलनी करीता कमी दाबाने पाणी सोडले, असा आरोप गव्हाणे यांच्यावर करीत त्यांना अंधाळे चौरे कॉलनीत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपींनी गव्हाणे यांच्या तोंडावर चप्पल फेकून मारण्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दत्तात्रय जपे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com