अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीचा प्रस्ताव नाशिक येथील विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.

त्यामुळे सभापती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांच्या नावाची चर्चा आहे.

महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नव्याने आठ सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. भाजपाचे मनोज कोतकर हे सध्या सभापती आहेत. त्यांचे सभापतिपद आठ सदस्यांची नव्याने नियुक्ती केल्याने धोक्यात आले आहे. नवीन आठ सदस्यांची नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सभापतिपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडून सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. महापालिकेच्या नगरसचिव विभागाने आयुक्त तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या मान्यतेने प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. विभागीय आयुक्तांकडून निवडणुकीची वेळ व तारीख जाहीर केली जाईल.

स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले हे इच्छुक आहेत. त्यांनी सदस्यांच्या गाठीभेटी घेत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इतर सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ समान आहे. मागील सभापती निवडणुकीच्यावेळी सेनेने योगीराज गाडे यांचा अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी गाडे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे कोतकर हे राष्ट्रवादीकडून सभापती झाले.