अहमदनगर (प्रतिनिधी) -

अहमदनगर महानगर पालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेतला असून या सर्वेक्षणामध्ये 2021

चा ओ.डी.एफ प्लस प्लस मानंकन मिळाले आहे.

या मानंकाच्या सदर कामाच्या श्रेयामुळे फाईव स्टार मानंकन मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सन 2020 ला महापालिकेला ओ.डी.एफ प्लस, प्लस मानंकन भेटले होते. या मानंकन मिळविण्यासाठी शहरातील 32 सार्वजनिक शौचालयाची सर्वेक्षण करण्यात आले होते.

त्यामधील 5 सार्वजनिक शौचालयाला सर्वोत्कृष्ट शौचालय म्हणून घोषित करण्यात आले होते. सन 2020-21 या वर्षी स्वच्छ भारत अभियानामध्ये फाईव्ह स्टार मानंकनासाठी भाग घेतला आहे. शहरातील 32 सार्वजनिक शौचालयाची तपासणी करण्यात आले. यामध्ये सर्वची सर्व 32 सार्वजनिक शौचालये अतिउत्कृष्ट दर्जाचे शौचालय पाहणी अहवालातून आढळून आल्यामुळे फाईव्ह स्टार मानंकनासाठी मदत होणार आहे.

या कामासाठी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त घणकचरा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या मेहनतीला फळ मिळाल्या असल्याची माहिती स्वच्छ संरक्षण कक्ष प्रमुख पी. एस. बिडकर यांनी सांगितले.