आंदोलनामुळे अहमदनगर महापालिका ठप्प

आयुक्तांच्या चर्चेनंतर तोडगा न निघल्याने आंदोलन सुरुच
आंदोलनामुळे अहमदनगर महापालिका ठप्प

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी युनियनने आंदोलन सुरू केल्याने महापालिकेतील कामकाज ठप्प गुरूवारी झाले.

दुपारी आयुक्तांसमवेत चर्चा होऊनही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते.

पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा फरक एक रकमी देणे, पदोन्नती दिलेल्या कर्मचार्‍यांचा फरक द्यावा, थकित भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करावी, सेवानिवृत्तांची देणी द्यावीत आदी मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी युनियनने आंदोलन हाती घेतले आहे. धरणे आंदोलनाचा इशारा यापूर्वीच दिला होता. युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सकाळी महापालिकेत येऊन सर्व कर्मचार्‍यांना काम बंद करण्यास सांगितले.

सर्व कर्मचारी काम बंद करून महापालिकेतील रिकाम्या जागेत धरणे देऊन बसले. दुपारी आयुक्त श्रीकृष्ण मायकलवार व इतर अधिकार्‍यांसमवेत युनियनच्या पदाधिकार्‍यांची चर्चा झाली. सर्व देणी एकाचवेळी देणे शक्य नसले तरी तीन कोटींपर्यंतची देणी टप्प्याटप्प्याने देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. मात्र युनियनने किमान पाच कोटींपर्यंतची देणी द्यावीत, असा आग्रह धरला. या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने आंदोलन दुपारीही सुरूच होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com