मनपा कोविड सेंटरमध्ये उपलब्ध होणार ऑक्सिजन बेड

ऑक्सिजन लाईन बसविण्यासाठी मागविली निविदा
मनपा कोविड सेंटरमध्ये उपलब्ध होणार ऑक्सिजन बेड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात आयुर्वेद महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची लाईन बसविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारावे, यासाठी शहर काँग्रेसने मनपात आंदोलन केले होते. यानंतर मनपाने हा निर्णय घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

शहरामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे 161 ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतनला 60, आयुर्वेद महाविद्यालयात 27 व जैन पितळे बोर्डिंग येथे 74 ऑक्सिजन बेड उभे करण्यात येणार आहेत. ऑक्सिजन बेडपर्यंत कॉपर धातूची लाईन बसवावी लागते. ही लाईन बसवण्यासाठी खासगी संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. एका बेडसाठी सुमारे 14 हजार रुपये खर्च येणार असून ते काम खासगी संस्थेकडून करून घेतले जाणार आहे. मनपाने स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.

मनपाच्या सावेडी उपनगरातील कचरा डेपोच्या जागेत हा ऑक्सिजन प्लँट उभा राहणार आहे. करोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज भासत आहे. परंतु, ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. मनपाचे शहरात ठिकठिकाणी कोविड सेंटर आहेत. या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने येथे दाखल होणार्‍या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. आता ऑक्सिजन बेड उपलब्ध झाल्यास रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com