महापालिका
महापालिका
सार्वमत

महापालिका आठवडाभर बंद

वर्क फ्रॉम होम

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देत करोना संकट काळात महापालिकेने आठ दिवस काम बंदचा निर्णय घेतला आहे. नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून नागरिकांनी ऑनलाईन कामे करावीत असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

करोनाने महापालिकेच्या मुख्यालयात शिरकाव केला आहे. अनेकांना बाधा झाल्यानंतर महापालिकेने आजपासून 16 तारखेपर्यंत मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. संघटनेनेही तशी मागणी केली होती.

मुख्यालयातील कामासाठी सहाय्यक आयुक्त एस.बी.तडवी तसेच माळीवाडा, झेंडीगेट, बुरूडगाव आणि सावेडी प्रभाग समिती प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नगरकरांसाठी ऑनलाईन तक्रार नोंदविण्याकरीता (0241)2343622 हा नंबर देण्यात आला आहे.

महापालिका बंद असली तरी महत्त्वाचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम पध्दतीने कामकाज करणार आहेत. आज सोमवारी सकाळी मुख्यालयाचा दरवाजाच कुलूप लावून बंद करण्यात आला. नागरिकांनी महापलिकेत न येता घरूनच ऑनलाईन पध्दतीने कामे करावीत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com