महापालिक
महापालिक
सार्वमत

बोरगे, मिसाळ यांचा पदभार डॉ. राजूरकर, बल्लाळ यांच्याकडे

Arvind Arkhade

अहमदनगर (प्रतिनिधी) - महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ गुन्हा दाखल झाल्याने ते दोन दिवसांपासून गायब आहेत. त्यामुळे महापालिकेच्या भाषेत ते ‘अनुपस्थित’ असल्याने त्यांच्याकडील कामकाजाचा पदभार अन्य अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला आहे.

करोनामुळे सध्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पद रिक्त ठेवून चालणार नाही. त्यामुळे डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आला आहे. करोना उपाययोजनेसाठी त्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच अग्निशमन विभागाचा पदभार अभियंता कल्याण बल्लाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यांना अग्निशमन विभागात पूर्णवेळ काम करता यावे यासाठी त्यांच्याकडील विद्युत विभाग प्रमुखपदाचा कार्यभार काढण्यात आला असून, तो कार्यभार अभियंता आर. जी. मेहेत्रे यांच्याकडे सोपविला आहे.

मेहेत्रे यांच्याकडे प्रकल्प विभाग असून, त्यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांची कामे ते पाहत होते. ते पूर्ववत पाहून मेहेत्रे यांनी विद्युत विभागाचे कामकाज पाहायचे आहे. पाणीपुरवठा विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले अभियंता महादेव काकडे यांना मानधनावर पुन्हा घेण्यात आले आहे. अमृत, फेज टू या पाणी योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे फक्त हीच जबाबदारी देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com