अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता यांच्या पदोन्नतीचा वाद पुन्हा एकदा नगरविकास विभागाच्या कोर्टात पोहचला आहे.

शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश होऊनही आयुक्त कारवाईस टाळाटाळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे

उपअभियंता कल्याण यशवंत बल्लाळ यांना कनिष्ठ अभियंता या पदावर पदोन्नती देताना अनियमितता झाल्याचे नगरविकास विभागाच्या पत्रात म्हटले आहे. या अनियमिततेस जबाबदार असणार्या अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करून नियमानुसार त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तसा अहवाल शासनाकडे पाठवा असे पत्र नगरविकास विभागाने 22 सप्टेंबर 2020 रोजी महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.

आयुक्तांनी कारवाई न करता पुन्हा मार्गदर्शनासाठी नगरविकास विभागाकडे पत्र पाठविले आहे. आयुक्त हे जाणूनबुजून बल्लाळ यांना पाठीशी घालून कारवाईस विलंब करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.