थोरात कारखान्याची रुग्णवाहिका व एसटी बसचा अपघात, रुग्णवाहिका चालक जखमी

थोरात कारखान्याची रुग्णवाहिका व एसटी बसचा अपघात, रुग्णवाहिका चालक जखमी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याची रुग्णवाहिका व एसटी बस यांची धडक होऊन झालेल्या अपघातात रुग्णवाहिकाचे मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संगमनेर महाविद्यालयाजवळ घडली. या अपघातात रुग्णवाहिका चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची रुग्णवाहिका क्रमांक एम. एच. 17 बी. डी. 2692 ही साखर कारखान्याकडे जात होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संगमनेर महाविद्यालय जवळील अकोले बायपास च्या कडेला या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. सासवड आगाराची बस क्रमांक एम. एच. 14 टी. 4197 व या रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात रुग्णवाहिकेचे व बसचे नुकसान झाले. रुग्णवाहिका चालक जखमी झाला. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com