भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता दुभाजकाला धडकल्याने पलटी

भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता दुभाजकाला धडकल्याने पलटी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

भरधाव वेगाने जाणारी रुग्णवाहिका (Ambulance) रस्ता दुभाजकावर धडकल्याने पलटी (Accident) झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील दिल्ली नाका (Delhi Naka) परिसरात घडली.

भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता दुभाजकाला धडकल्याने पलटी
करोना.. आरोग्य यंत्रणा सतर्क

नाशिक - पुणे महामार्गावरील (Nashik Pune Highway) हिवरगाव पावसा टोल नाका परिसरात झालेल्या अपघातातील जखमींना (Injured) आणण्यासाठी शहरातील कुटे हॉस्पिटलची रुग्णवाहिका रात्री अकरा वाजेच्या सुमारास निघाली होती. ही रुग्णवाहिका भरधाव वेगाने जात होती. दिल्ली नाका परिसरातील वळणावर असलेल्या रस्ता दुभाजकावर रुग्णवाहिका (Ambulance) धडकली. यामुळे रुग्णवाहिका पलटी झाली. सुदैवाने या अपघातात (Accident) कोणीही जखमी झालेले नाही. दिल्ली नाका (Delhi Naka) परिसरातील युवकांनी रुग्णवाहिका उभी करून रस्त्याच्या बाजूला लावली.

भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता दुभाजकाला धडकल्याने पलटी
जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका 18 मे रोजी

संगमनेर (Sangamner) शहरातील विविध रुग्णालयांच्या रुग्णवाहिका भरधाव वेगाने जात असतात. यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. या रुग्णवाहिका नियमबाह्य पद्धतीने चालवले जातात. काही रुग्णवाहिका चालकाजवळ लायसन नसतानाही ते रुग्णवाहिका (Ambulance) चालवतात. काही वाहन चालकांचे वय नसतानाही ते खुलेआम रुग्णवाहिका चालवत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी याबाबत नियंत्रण आणावे असे मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता दुभाजकाला धडकल्याने पलटी
राज्य शासन व जिल्हाधिकार्‍यांना उच्च न्यायालयाची नोटीस
भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता दुभाजकाला धडकल्याने पलटी
घरात छुपा कॅमेरा लावून महिलेचे चित्रीकरण; गुन्हा दाखल
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com