
घारगाव |वार्ताहर| Ghargav
नाशिक - पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) पुण्याच्या दिशेने बटाटे घेऊन जाणार्या ट्रक (Truck) चालकाला रात्रीच्या वेळेस गतिरोधकाचा (Speedbreaker) अंदाज न आल्याने ट्रक समोरील अज्ञात वाहनाला धडकून (Truck Accident) दुभाजकावर आदळला. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रकचालक आणि क्लिनर दोघे बचावले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनेर (Sangamner) तालुक्यातील आंबी फाटा येथे घडला.
याबाबत अधिक माहिती अशी, ट्रक क्रमांक एम.पी. 07 एच.बी. 2788 मधून चालक व क्लिनर (नाव समजू शकले नाही) हे ग्वालियर (मध्यप्रदेश) येथून बटाटे (Potatoes) घेऊन नाशिक - पुणे महामार्गाने पुणे जिल्ह्यात (Pune) जात असताना शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास ते संगमनेर (Sangamner) तालुक्यातील आंबी फाटा येथे आले असता ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक समोरील अज्ञात वाहनाला धडकला.
पुढे गतिरोधकावर आदळून दुभाजकावर चढला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. चालक स्टिअरिंगमध्ये अडकला असता महामार्गावरून जाणार्या प्रवाशांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात (Accident) जीवितहानी झाली नाही. मात्र, नाशिककडे जाणारी एक लेन बंद झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
ट्रक अपघात (Truck Accident) होऊन नाशिककडे (Nashik) जाणार्या लेनवर आला होता. त्यामुळे नाशिककडे जाणार्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने प्रवाशांनी डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली.