संगमनेर (प्रतिनिधी) -

तालुक्यातील आंबी खालसा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 11 जागांकरिता दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी चौघांनी

अर्ज मागे घेतल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात, जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबी खालसा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

गेली 15 वर्षे सरपंचपद सांभाळणारे सुरेश कान्होरे यांच्यासह उपसरपंच गोकुळ कहाणे, तुळशीनाथ भोर, सोपान भोर, अमोल कहाणे, ज्ञानेश्वर कहाणे, श्रीधर कहाणे, शांताराम तांगडकर, अमोल गाडेकर, तानाजी मुंढे, सुरेश गाडेकर, युसूफ तांबोळी, पांडुरंग तांगडकर, यशवंत भुजबळ, हरिभाऊ गाडेकर, दाऊद शेख, विजय भोर, कासम सय्यद, बजरंग तांगडकर आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीत यंदाच्या निवडणुकीत तरुणांच्या हाती ग्रामपंचायतीची सत्ता देण्याचे ठरले. सर्व समाजातील तरुणांना या निवडणुकीत संधी देण्यात आली. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये नंदा दिनकर तांगडकर, मनीषा रामनाथ तांगडकर, अमोल पंढरीनाथ गाडेकर, तान्हाजी सुरेश मुंढे यांनी माघार घेतली.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

वॉर्ड क्रमांक 1- दिलीप किसन हांडे, मनीषा बाळू गाडेकर, शुभांगी अमोल कहाणे, वॉर्ड क्रमांक 2- बाळासाहेब निवृत्ती ढोले, दीपक उत्तम गावडे, अनिता सखाहरी तांगडकर, वॉर्ड क्रमांक-3- रशिद याकुब सय्यद, अंजली सुरेश गाडेकर, वॉर्ड क्रमांक 4- सुवर्णा संजय गडगे, विलास सोमनाथ मधे, अंजली एकनाथ जाधव.