आंबी येथे पूर्णवेळ तलाठ्याची नियुक्ती करण्यात यावी

आंबी येथे पूर्णवेळ तलाठ्याची नियुक्ती करण्यात यावी

आंबी |वार्ताहर| Ambi

राहुरी (Rahuri) तालुक्यातील आंबी (Ambi) सजेला पूर्णवेळ तलाठ्याची (Talathi) नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे (Jalindar Rode) यांनी केली आहे. या मागणीचे (Demand) निवेदन त्यांनी राहुरीचे (Rahuri) उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप (Sub-Divisional Officer Dayanand Jagtap), तहसीलदार एफ. एस. शेख (Tehsildar F. S. Shaikh) यांना दिले आहे.

येथील तलाठी रुपेश कारभारी यांची संवर्ग बदली झाल्यानंतर आंबी (Ambi) सजेला अद्यापही पूर्णवेळ तलाठी (Talathi) देण्यात आलेला नाही. त्यानंतर प्रभारी पदभार पिंपळगाव फुणगीचे (Pimpalgav Fugani) तलाठी अशोक चितळकर (Talathi Ashok Chitalkar) यांना देण्यात आला आहे. त्यांचीही श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील भोकर (Bhokar) येथे बदली झाल्याने सध्या आंबी सजेचा प्रभारी पदभार देवळाली प्रवराचे तलाठी दीपक साळवे (Deolali Pravara Talathi Deepak Salve) यांच्याकडे देण्यात आला आहे.

आंबी (Ambi) सजेअंतर्गत आंबी, अंमळनेर, केसापूर ही गावे येतात. या गावांचा विस्तार मोठा आहे. विविध प्रकारचे दाखले, सातबारा, आठ अ उतारे, उत्पन्नाचे दाखले, विविध विशेष सहाय्य योजनांसाठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागतात. सध्या मोबाईलद्वारे ई-पीक पहाणी (E-Crops) कार्यक्रम सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com