राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील आंबी-अंमळनेर येथील 35 वर्षीय संपत सखाराम पाळंदे हे राहात्या घरातून बेपत्ता झाले होते.

रविवारी दि. 21 मार्च रोजी सायंकाळी घराजवळील विहिरीत पाळंदे यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

आंबी -अंमळनेर येथील संपत पाळंदे हे गेल्या दोन दिवसांपासून राहात्या घरातून बेपत्ता होते. त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाही. दि.21मार्च रोजी त्यांच्या मालकीच्या घराजवळील विहिरीत त्यांचा मृतदेह मिळून आला.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाळंदे यांचा मृतदेह वर काढण्यात आला. पाळंदे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुली असा परिवार आहे. राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.