मुरकुटेंच्या उपोषणाला राजकीय दर्प

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कोरडे यांची टीका
मुरकुटेंच्या उपोषणाला राजकीय दर्प
अंबादास कोरडे

भेंडा |वार्ताहर| Bhenda

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व त्यांचे सहकारी यांनी ज्ञानेश्वर कारखाना गेटसमोर केलेल्या लाक्षणिक उपोषण आंदोलनाला राजकीय दर्प असून यातील सक्रीयता आश्चर्यजनक व अजब आहे अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते प्रा.जालींदर पाटील यांचे समवेत स्वतः मी व डॉ. अशोक ढगे आम्ही दोघांनी सविस्तर चर्चा केली असता प्रा. जालींदर पाटील यांनी स्पष्ट प्रतिपादन केले की, ज्ञानेश्वर कारखान्याने एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकर्‍यांना अदा केल्यामुळे मुरकुटे यांच्या आंदोलनाला भक्कम पाया नाही. मुरकुटे स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याकरीता पक्षीय राजकारण करीत आहे. सहकारात कुठलाही पक्ष नसतो. परंतु मुरकुटे यांना विधानसभेत झालेला पराभव पचविणे जड झालेले आहे. त्यामुळे ते स्वतःचे राजकीय आस्तित्व टिकविण्यासाठी शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आम्ही या भाजपप्रणित राजकीय आंदोलनाचा जाहीर निषेध करीत आहोत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com