नगरच्या अमरधाममध्ये करोना रुग्णांवर अंत्यसंस्कार सुरू असताना घडला 'हा' प्रकार

नगरच्या अमरधाममध्ये करोना रुग्णांवर अंत्यसंस्कार सुरू असताना घडला 'हा' प्रकार

अहमदनगर|Ahmednagar

अमरधाममध्ये कोव्हिड मृतांवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच किरकोळ वादातून दोघांनी एकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.

त्यामुळे अमरधाममध्ये गोंधळ उडाला. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. हल्ला केल्यानंतर ते पसार झाले. कोतवाली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या परिसरात तळीरामांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो, त्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात कोणीही फिर्याद देण्यासाठी आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

करोना रूग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी मोठ्याप्रमाणात मृतदेह येत असतात. रविवारीही अमरधाममध्ये मृतांवर अंत्यसंस्कार सुरू असताना दुचाकी घेऊन आलेल्या दोघांनी एकावर कोयत्याने हल्ला चढविला. समोरच्याने कोयत्याचा हा वार हातावर झेलला. त्यामुळे जखमीच्या हाताचे बोट तुटले आहे.

त्याचबरोबर पायावर देखील वार झाला आहे. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर हल्ल्यानंतर दुचाकीवरून पसार झाले. हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाले हे समजू शकले नाही.दरम्यान अमरधाममध्ये तळीरामांचा वावर वाढला आहे. स्थानिक लोकांचा यामध्ये समावेश असतो. तळीरामांमध्ये वाद झाल्याने यातूनच हल्ला झाल्याची चर्चा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com