अंमळनेर ग्रामपंचायतसाठी 86 टक्के तर शिरेगावात 79 टक्के मतदान

अंमळनेर ग्रामपंचायतसाठी 86 टक्के तर शिरेगावात 79 टक्के मतदान

करजगाव | Karajgav

नेवासा तालुक्यातील अंमळनेर  ग्रामपंचायत निवडणुक किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली सरपंच पद व  9 सदस्य जागेसाठी निवडणुक लढवली गेली. एकूण मतदान 1687 पैकी 1464 मतदारांनी मतदान केले .

86 टक्के मतदान झाले. वार्ड 1) 506 पैकी  439 वार्ड 2) 714 पैकी 607 तर वार्ड 3) 467 पैकी 418 मतदान झाले. शिरेगाव ग्रामपंचायत निवडणूक शांततेत संपन्न. आज रविवार दि. 18 / 12/2022 रोजी शिरेगाव ग्रामपंचायत निवडणुक शांततेत पार पडली. सरपंच पदाची निवडणुक बिनविरोध झाल्याने 9 जागेसाठी निवडणुक लढवली गेली. एकूण मतदान 2272 पैकी 1797 मतदारांनी मतदान केले.

79 टक्के मतदान झाले. वार्ड 1)921 पैकी  761, वार्ड 2) 639 पैकी 525 तर वार्ड 3) 612 पैकी 511 मतदान झाले. यावेळी सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com