अपघातात अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने महिलेचा मृत्यू

अपघातात अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने महिलेचा मृत्यू

करजगाव |वार्ताहर| Karajgav

ट्रॅक्टरला (Tractor) ओव्हरटेक करत असताना दोन मोटारसायकलींची धडक (Two Bike Accident) होवून एका मोटारसायकलवरील महिला ट्रॅक्टरच्या चाकाखाली येवून तीचा मृत्यू (Death) झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नेवासा (Newasa) तालुक्यातील अंमळनेर-निंभारी रस्त्यावर घडली.

अपघातात अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने महिलेचा मृत्यू
दुधाच्या टँकरला दोन मोटार सायकलची धडक, 3 ठार एक गंभीर

नेवासा तालुक्यातील अंमळनेर-निंभारी रस्त्यावर घावटे वस्तीजवळ शुक्रवारी रात्री निंभारी येथील सुनिता संजय गवळी यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. निंभारी येथील धनंजय संजय गवळी हा त्याची आई सुनिता व ज्ञानेश्वरी जयप्रकाश गवळी यांना घेवून चुलतबहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी अंमळनेर येथे जात होता.

अपघातात अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने महिलेचा मृत्यू
डॉ. अजित नवले यांच्या नावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध ?

दरम्यान ऊस घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. त्यात गवळी याची मोटरसायकल ट्रॅक्टरच्या बाजूने पडली. यात सुनिता गवळी यांच्या अंगावरुन चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या मोटारसायकलवरील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे.

अपघातात अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने महिलेचा मृत्यू
गावकरी झाले गुरूजी; या गावात संपकाळात शाळा सुरू

हे जखमी दुचाकीस्वार गोणेगाव येथील असल्याची माहिती कळते. मयत सुनिता गवळी यांच्यावर शवविच्छेदनानंतर शनिवारी दुपारी निंभारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या अपघात मृत्यूबाबत सोनई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

अपघातात अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने महिलेचा मृत्यू
‘अवकाळी’च्या शक्यतेमुळे पाचेगाव परिसरात गहू काढणीची लगबग

अपघाताने हिरावले पुतणीचे लग्न, घरभरणी व मुलाच्या लग्नाचा आनंद

शनिवारी पुतणीचा विवाह तर रविवारी घरभरणी निमीत्त सत्यनारायण पुजा होणार होती. तसेच मुलाचे लग्न जमले होते.पुढील महिन्यात वरमाई होण्याचे स्वप्न मात्र अपुरे राहिले. या अपघाताने गवळी कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटले.

अपघातात अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने महिलेचा मृत्यू
संगमनेरच्या पठार भागात जोरदार गारपीट
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com