देवगड फाटा l वार्ताहर

महाराष्ट्र राज्या शेजारील कर्नाटक व इतर ठिकाणी जाहिर झालेले नविन लॉकडाऊन व नुकत्याच पार पडलेल्या श्रीक्षेत्र आळंदी व श्रीक्षेत्र जेजूरी येथील अनुभव लक्षात घेता, श्रीक्षेत्र देवगड संस्थान प्रशासनाने दत्त जन्म सोहळाप्रसंग अत्यंत अल्पसंख्येत साजरा करण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने

मंगळवार दि.29 डिसेंबर रोजी सकाळ पासून ते बुधवार दि.30 डिसेंबर रोजी सायंकाळ पर्यंत प्रवरासंगम, देवगड फाटा व नेवासा येथून श्री क्षेत्र देवगड कडे येणारे रस्ते बंद केले जाणार असून श्री क्षेत्र देवगड येथील नविन स्वागतद्वारही पूर्णतया बंद राहील अशी माहिती मंदिर संस्थान प्रशासनाने दिली आहे.

श्रीक्षेत्र देवगड संस्थान प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, या वर्षी करोना महामारीच्या जागतिक संकटामुळे सर्वच क्षेत्रामध्ये कमालीची स्वच्छता व सुरक्षित अंतर पाळण्यात येत असून सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रमांवर शासन प्रशासनाकडून अनेक बंधने आलेली आहेत. त्या दृष्टीने, कार्यकारी मंडळ तसेच भक्तगणांशी चर्चा करुन या वर्षी संपन्न होणारा भगवान दत्तात्रेय जन्म सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतलेला आहे.

शेजारील कर्नाटक व इतर ठिकाणी जाहिर झालेले नविन लॉकडाऊन व नुकत्याच पार पडलेल्या श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र जेजूरी येथील अनुभव लक्षात घेता, संस्थान प्रशासनाने दत्त जन्म सोहळाप्रसंग अत्यंत अल्पसंख्येत साजरा करण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने मंगळवार दि.29 डिसेंबर 2020 रोजी सकाळपासून ते बुधवार दि.30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळ पर्यंत प्रवरासंगम, देवगड फाटा व नेवासा येथून श्री क्षेत्र देवगड कडे येणारे रस्ते बंद केले जाणार असून श्री क्षेत्र देवगड येथील नविन स्वागतद्वारही पूर्णतया बंद राहील, याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.

दत्त जन्मसोहळ्याचा आनंद अनुभवण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दत्त जन्म सोहळ्याचे विविध दूरचित्रवाहिन्या तसेच फेसबूकद्वारा थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेऊन प्रत्यक्ष श्री क्षेत्र देवगड येथे येण्याचे टाळावे व संस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात येत आहे. भाविकांच्या होणाऱ्या संभाव्य गैरसोयी बद्दल संस्थान प्रशासन दिलगिर आहे.