सुपा (वार्ताहर) -

अण्णा हजारे हे फक्त व्यक्ती नसून ते देशाचे महाराष्ट्रचे भुषण आहेत. ते जे काही करतात ते स्वतःसाठी नसून सर्वासाठी आहे. तेव्हा त्यांचे सर्व मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे मांडणार असून अण्णांनी उपोषण करु नये, यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी शुक्रवारी सांयकाळी अण्णासोबत चर्चा झाल्यानंतर पत्रकारांना दिली.

30 जानेवारीपासून ज्येष्ठ समाजसेवक पद्मभुषण अण्णा हजारे यांनी शेतकर्यांसाठी शेवटचे अंदोलन करण्याचे निश्चिय केल्यावर केंद्रातील भाजप सरकार खडबडून जागे झाले आहे. आता अण्णाची मनधरणी करण्यासाठी रोज वेगवेगळे दूत पाठवले जात आहे.

गेल्या महिनाभरात हरीभाऊ बागडे, खा. भागवत कराड, गिरीष महाजन व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई असफल होऊन अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. हे कळल्यावर शुक्रवारी सांयकाळी विरोधी पक्षनेते फडणवीस हे आ. विखे पाटील व महाजन यांच्या सोबत राळेगणला आले.

अण्णा बरोबर बंद खोलीत दोन तास चर्चा झाली. चर्चेनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आम्ही अण्णाचे सर्व मुद्दे केंद्र सरकारकडे पोहचवणार असून अण्णांना अंदोलन करावे लागणार नाही, यासाठी प्रयत्न करणार आहोत. अण्णा जे काही करतात ते समाज हितासाठी असून त्यामुळे त्याच्या मागण्याकडे खुप गंभीरपणे पहात आहोत. मागील काळात अण्णांनी केंद्र सरकारला 23 पत्र पाठवली त्याची एकही उत्तर आले नाही यावर अण्णा खूप नाराज आहे,

याबाबत विचारल्यावर फडणवीस म्हणाले, अण्णांच्या पत्रांना इतक्या सहजासहजी उत्तरे देता येत नाहीत. यासाठी सविस्तर चर्चा करावी लागते. प्रत्येक मुद्दावर विचार विनीमय करावा लागतो, मगच अण्णांशी बोलावे लागते. आम्ही केंद्र सरकार, केंद्रीय कृषी मंत्री यांच्या बरोबर लवकरातलवकर चर्चा करुन अण्णावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस शेवटी म्हणाले.