टुकार कामगार संघटना नसल्याने...; काय म्हणाले कामगार नेते?

टुकार कामगार संघटना नसल्याने...; काय म्हणाले कामगार नेते?

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

टुकार कामगार संघटना (Kamgar union) कोणत्याही शहराचे औद्योगिक वातावरण व शांतता खराब करत असल्याचे आपण राज्यभर पहातो, पण आपल्या येथे तसे चित्र दिसत नाही याचे समाधान आहे. कामगारांनी (Workers) आपल्या हक्कासोबत कर्तव्यही पार पाडणे गरजेचे आहे. कारखानदार आणि कामगारांनी एकजूटीने काम केल्यास वैभवशाली अहमदनगर (Ahmednagar) शहराचा औद्योगिक विकास (Industrial development) शक्य आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान सभेचे (All India Kisan Sabha) नेते अ‍ॅड.कॉ. बन्सी सातपुते (Bansi Satpute) यांनी केले.

एमआयडीसीमधील (MIDC) सुयश मेटल प्रेसिंग्ज लिमिटेड (Suyash Metal Pressings Ltd.) या कारखान्यातील 18 कामगारांना कायम केल्याचे पर्मनंट लेटर प्रदानप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. शहराच्या औद्योगिक विकासात कारखानदार आणि कामगार यांच्यातील गैरसमज कारणीभूत ठरतो. गैरसमजाचा हा भाग काढून टाकणार्‍या कामगार संघटना सोबत असल्यास दोन्हीही घटकांना न्याय मिळतो, याची प्रचीती नगरमध्ये आली आहे, असे ते म्हणाले.

टुकार कामगार संघटना नसल्याने...; काय म्हणाले कामगार नेते?
शस्त्राचा धाक दाखवुन धाडसी दरोडा; मोठा ऐवज लुटला

प्रारंभी संघटनेतील दिवंगत कामगार सहकारी दिलशान शेख भाभी आणि शंकर चिप्पा अण्णा यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कामगार संघटना महासंघ आणि क्रांतिसिंह कामगार संघटनेचे कॉ. भैरवनाथ वाकळे यांनी आपल्या प्रास्ताविक केले. भारतभर कामगार मोठ्या संख्येने बेरोजगार होत आहेत, तर येथे कारखान्यातील कामगार हे कायमस्वरूपी होत आहेत, हा विरोधाभास आहे. आपले सल्लागार अ‍ॅड. कल्याणी मोदगीकर आणि अ‍ॅड. दिपक चंगेडे यांच्या पुढाकाराने हे झाले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे कामगार भविष्यनिर्वाह निधी (पिएफ) संदर्भात कामगारांना स्वयंपुर्ण होण्यासाठी मार्गदर्शन मेळावा अथवा वेबीनार घेण्याचे सुचविले. सुयशचे संचालक अभय मिस्त्री, अ‍ॅड. चंगेडे, कामगार प्रतिनिधी बाळासाहेब सागडे, उर्जिता फौंडेशनच्या अध्यक्षा संध्या मेढे, नगर तालुका किसान सभेचे कॉ.विकास गेरंगे यांनी मनोगत व्यक्त केले.

टुकार कामगार संघटना नसल्याने...; काय म्हणाले कामगार नेते?
हे देवाऽऽ! चोरट्यांनी लांबविली मंदिरातील दानपेटी

फिरोज़ शेख, दत्ताभाऊ वडवणीकर, विजय केदारे, विकास गेरंगे, दिपक नेटके, महादेव पालवे, लहुजी लोणकर, अविनाश कर्पे, दिपक शिरसाठ, संदिप पवार, चंद्रकांत माळी, संतोष गायकवाड, पैठणकर, प्रकाश कोकाटे आदी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वितेसाठी बर्डे ताई, बनकरताई, खजिनदार ताई, अमोल चेमटे, अरूण थिटे, रामभाऊ गवळी, राहुल कराळे, गणेश माने, दत्ता जाधव, रावसाहेब कर्पे, प्रविण राजेंद्र शिरसाठ, प्रशांत चांदगुडे, आसाराम भगत, महादेव भोसले, राजु नन्नवरे, नानासाहेब खरात, सतीश निमसे, अमोल पळसकर, कॉम्रेड कार्तिक आदी उपस्थित होते. सुत्रसंचालनात सेक्रेटरी कॉ.रामदास वागस्कर यांनी केले. आभार तुषार सोनवणे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com