जिल्हा रुग्णालय आग प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चौघांना पोलीस कोठडी

जिल्हा रुग्णालय आग प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चौघांना पोलीस कोठडी

अहमदनगर|Ahmedagar

जिल्हा रूग्णालयातील (Civil Hospital) अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी (Intensive Care Unit Fire Case) मंगळवारी अटक (Arrested) केलेल्या चार जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत (Police Cell) ठेवण्याचा आदेश न्यायालयाने (Court Order) दिला. आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी (Medical officer) व तीन परिचारिकांचा (Nurse) समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे (Medical Officer Visakha Shinde), परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke) यांनी या चार जणांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत (Police Cell) ठेवण्याचा आदेश केला आहे.

6 नोव्हेंबर रोजी जिल्हा रूग्णालयातील (Civil Hospital) करोना अतिदक्षता विभागाला आग (Intensive Care Unit Fire) लागली. या दुर्घटनेत 11 रूग्णांचा मृत्यू (Death) झाला असून सहा जण गंभीर जखमी (Injured) झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा (District Surgeon Dr. Sunil Pokhrana) यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Health Minister Dr. Rajesh Tope) यांनी स्वतः ही कारवाई केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दाखल गुन्ह्यात कलम वाढवून याप्रकरणी चार जणांना अटक केली. दरम्यान, या अटकेचे तीव्र पडसाद जिल्हा रूग्णालयात उमटले आहे. डॉक्टर, कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com