राळेगणसिद्धीतील सर्व नागरिकांची होणार 'करोना टेस्ट'

प्रत्येकालाच दिली जाणार करोना प्रतिबंधक लस
राळेगणसिद्धीतील सर्व नागरिकांची होणार 'करोना टेस्ट'

सुपा | वार्ताहर

करोनाची दुसरी लाट (corona second wave) ओसरत असतानाच तिसरी लाट (Corona third wave) येणार असल्याचे संकेत तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राळेगणसिद्धी येथील ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र (Raleganasiddhi Gram Panchayat and Primary Health Center) यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील सर्व नागरिकांची करोना चाचणी (covid test) करणार असल्याची माहिती सरपंच डॉ. धनंजय पोटे (Sarpanch Dr. Dhananjay Pote) यांनी दिली.

याविषयी माहिती देताना डॉ.पोटे म्हणाले की, पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये काही जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. मात्र ते संकट गावावर परत येऊ नये यासाठी आम्ही गावातील सर्व जण एकत्र येत या संकटाला गावाच्या वेशीबाहेरच ठेवणार आहे. त्यासाठी गावातील सर्व नागरिकांची चाचणी करून घेणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या मदतीने प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन चाचणी करणार आहे. तसेच प्रत्येक नागरिकाला करोना प्रतिबंधक लसीकरण (Corona vaccination) करणार असल्याची माहिती डॉ. पोटे यांनी दिली.

राळेगणसिद्धीतील सर्व नागरिकांची होणार 'करोना टेस्ट'
भयंकर! लहान मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत राळेगणसिद्धी गावाने आरटीपीसीआरच्या (RT-PCR test) एकूण ५० जणांची तर १०० जणांची अँटीजेन रॅपिड चाचणी (Antigen rapid test) केली. इतर गावांनी देखील अशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे असे डॉ. अपूर्वा वाघमारे (Dr. Apoorva Waghmare) यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी (Jaysingh Mapari), माजी सरपंच मंगल मापारी (Mangal Mapari), ग्रामपंचायत सदस्य मंगल उगले (Mangal Ugale), सुनिल हजारे (Sunil Hajare) उपस्थित होते. तसेच डॉ. अपूर्वा वाघमारे, आरोग्य सहाय्यक रमाकांत जगताप (Ramakant Jagtap), आशा कर्मचारी मंगल मापारी (Mangal Mapari), सुनिता सोनवणे (Sunita Sonwane), स्वाती गडकर (Swati Gadkar) यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली.

राळेगणसिद्धीतील सर्व नागरिकांची होणार 'करोना टेस्ट'
आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास पुन्हा आंदोलन

सध्या गावातील सर्व कामे ही शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सुरू आहेत. गावातील दुकाने व इतर आस्थापना ह्या दररोज चार वाजता बंद केल्या जात आहेत. यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे (Anna Hazare) यांचीही आरोग्य विभागाच्या मदतीने आरटीपीसीआर चाचणी (RT-PCR test) करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com