बालमटाकळीच्या दुर्घटनेतील सर्वांचे मृतदेह सापडले

पिता पुत्रांवर शोकाकुल वातावरणात एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार
बालमटाकळीच्या दुर्घटनेतील सर्वांचे मृतदेह सापडले

बोधेगाव | Bodhegaon

पुरात वाहून गेलेले कृष्णा घोरपडे यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा प्रथमेश याचाही मृतदेह आज सापडला. या पिता पुत्रांवर शोकाकुल वातावरणात एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्घटनेत घोरपडे व त्यांच्या दोन मुलांचा अंत झाला. यातील मुलगी वैष्णवी हीचा काल शुक्रवारी, घोरपडे यांचा आज सकाळी आणि मुलगा प्रथमेश याचा आज दुपारी मृतदेह सापडला. त्यानंतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. मृतदेह शोध मोहिमेसाठी चकलंबा पोलिस ठाण्याचे सपोनि. विजयकुमार देशमुख, पीएसआय पवार, पीएसआय झिंझुर्डे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. चारच्या सुमारास बालमटाकळी येथे पिता पुत्रांवर एकाच चीत्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com