कोपरगावचा पोटगी वॉरंटमधील फरार आरोपी जेरबंद

एलसीबीची सुरतमध्ये कारवाई || न्यायालयाने ठोठावली दोन वर्ष शिक्षा
कोपरगावचा पोटगी वॉरंटमधील फरार आरोपी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रवंदे (ता. कोपरगाव) येथील पोटगी (Alimony) अटक वॉरंटमधील (Arrest Warrant) 12 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी सुरत (Surat) (गुजरात) येथून ताब्यात घेत जेरबंद (Arrested) केले. नितीन ज्ञानेश्वर मोरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दरम्यान आरोपी मोरे याला पोलिसांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, मालेगाव (जि. नाशिक) यांचे समक्ष हजर केले असता न्यायालयाने मोरे याला दोन वर्ष शिक्षा ठोठावली (Punished) असून त्यास सेंट्रल जेल, नाशिक रोड (Nashik Road) येथे हजर केले आहे. आरोपी मोरे विरूध्द प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, मालेगाव यांनी पोटगी वॉरंट बजावणी करणे कामी वॉरंट काढले होते. सदर वॉरंटची बजावणी करण्याच्या सूचना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील (DIG Dr. B.G. Shekhar Patil) , पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, संतोष लोढे, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने आरोपीचा सुरत येथे दोन दिवस शोध घेतला असता तो मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com