Crime News : वाहन चोरीचे दीडशेपेक्षा अधिक गुन्हे करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात

अपघातग्रस्तांकडून अधिकचे पैसे घेत असल्याने क्रेनची चोरी
Crime News : वाहन चोरीचे दीडशेपेक्षा अधिक गुन्हे करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात

आळेफाटा | Alephata

वाहन चोरीचे दीडशेहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत वाहन चोराला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आळेफाटा येथून ९ एप्रिल रात्री क्रेन चोरून नेले होते. राजू बाबुराव जावळकर (वय ५५ , रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ४०३,डोणजेफाटा, ता. हवेली,जि.पुणे) असे गुन्हा दाखल असलेल्या अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेली माहिती अशी की, आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीतून ९ एप्रिल रात्री पावणे बारा ते १० एप्रिल पहाटे पाच वाजताच्या सुमारास एम.एच.०४ डी.टी.०२८३ या क्रमांकाचे क्रेन आळेफाटा चौकापासून हाकेच्या अंतरावरून चोरीला गेले होते. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात क्रेन मालक भीमाशंकर सखाराम आवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Crime News : वाहन चोरीचे दीडशेपेक्षा अधिक गुन्हे करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात
Crime News : क्षुल्लक कारणावरुन वाद, दगडाने वार करून निर्घृणपणे संपवलं

या अनुषंगाने पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी पथक नेमले. सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांसह पथक गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांनी गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने राजू जावळकर याला डोणजेफाटा, ता. हवेली येथून ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने क्रेन अंगद पूनम यादव (सध्या रा. कळंबोली, मुंबई, मूळ. रा. आझमगड, उत्तरप्रदेश) यास विकले असल्याची कबुली दिली.

अंगद यादव याचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले असून राजू जावळकर याचेकडून एम.एच.१६,ए.जी.४०४४ क्रमांकाच्या स्कोर्पिओ वाहनासह ४० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Crime News : वाहन चोरीचे दीडशेपेक्षा अधिक गुन्हे करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात
नगर बाजार समिती निवडणूक मतदाना दरम्यान गोंधळ, भाजपची बस मतदान केंद्रावर आली अन्.... पाहा VIDEO

ही कामगिरी सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पो.स.ई पवार, पो.हवा विनोद गायकवाड, पो.हवा.नरेंद्र गायकवाड, पो.हवा भिमा लोंढे, पो.ना.संजय शिंगाडे, पो.ना.पंकज पारखे, पो. कॉ. अमित मालुंजे, पो.कॉ. नवीन अरगडे, पो. कॉ. हनुमंत ढोबळे, पो.कॉ.प्रशांत तांगडकर यांच्या पथकाने केली.

Crime News : वाहन चोरीचे दीडशेपेक्षा अधिक गुन्हे करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात
वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

चोरीच्या पैशांमधून मुलांचे शिक्षण

राजू जावळकरला दोन मुले असून ते बोर्डिंगमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यासाठी राजू हा दरवर्षी दोघांची ८० हजार रुपये फी भरतो. तर पत्नी ही गृहिणी आहे. आई-वडील हे पुण्याजवळील एका खेड्यात राहतात. राजू हा गेली ४० वर्ष वाहनचोरीचे गुन्हे करत आहे. चार चाकी चोरुन ती भंगारात विकाने हा त्याचा धंदा.

Crime News : वाहन चोरीचे दीडशेपेक्षा अधिक गुन्हे करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात
APMC Election 2023 : राहुरीमध्ये मतदानावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस; मतदार, उमेदवार अन् निवडणूक यंत्रणेची उडाली धांदल

अपघातग्रस्तांकडून अधिकचे पैसे घेत असल्याने क्रेनची चोरी

अपघात झाल्यास संबधित अपघातग्रस्त वाहन मालक हे अडचणीत असल्याचा फायदा घेत क्रेन चालक त्यांचेकडून अधिकचे पैसे उकळतात याचा मनात राग असल्याने राजू जावळकर याने हे क्रेन चोरले. ज्या वाहनांचे पेपर संपले आहेत व जेणेकरून मालक तक्रार करणार नाही. अशी जुनी चारचाकी वाहनांची चोरी करून ते भंगारात विकायचे काम राजू करतो.

Crime News : वाहन चोरीचे दीडशेपेक्षा अधिक गुन्हे करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात
बारसूमध्ये जोरदार राडा! पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com